बोदवड उपनगराध्यक्षांच्या भावासह पाच जणांविरूद्ध पोलिसात गुन्हा

0

बोदवड : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघण करीत बुधवारी सकाळी 11 वाजता सार्वजनिक ठिकाणी आठवडे बाजार भरवून मानवी जीविताचे आरोग्य धोक्यात येईल, असे कृत्य केल्याने बोदवड उपनगराध्यक्षांच्या भावासह पाच जणांविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक राजुसिंग चव्हाण (50) यांच्या फिर्यादी वरून उपनगराध्यक्षांचा भाऊ योगेश नारायण माळी (35), आर.एन.बागवान, शाहरुख खान मज्जीद खान, सै.अरबाज सै रहीम बागवान, रामदास रामचंद्र तुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नियमबाह्य भरवला बाजार
जळगाव जिल्हाधिकारी यांनी 23 जुलै रोजी काढलेल्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया साहितांचे कलम 144 प्रमाणे सध्या कोरोना विषारी संसर्गजन्य विषाणू आजारापासून नागरीकांचे संरक्षण करिता जमाव बंदी, संचार बंदी,जिल्हा बंदी असताना आदेशाचे पालन न करता सार्वजनिक ठिकाणी आठवडे बाजार भरवून तसेच तोंडाला मास्क न लावता मानवी जीवित व व्यक्तिगत आरोग्य धोक्यात येईल, असे कृत्य करून संसर्ग पसरवण्याची घातक कृती केल्याने उभयतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास हवालदार कालिचरण बिर्‍हाडे करीत आहेत.

Copy