Private Advt

बोदवडला सुधारीत आरक्षणानंतरही नगरसेवकांसह इच्छुकांच्या पदरी निराशा

महिलाराज येणार : सौभाग्यवतींना पुढे करण्याचा उमेदवारांपुढे पर्याय

बोदवड : शहरातील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, 12 नोव्हेंबर रोजी आरक्षण काढण्यात आले होते मात्र उच्च न्यायालयाच्या दाखल झालेल्या याचिकेच्या निर्णयामुळे हे आरक्षण रद्द झाल्यानंतर सोमवार, 15 रोजी नव्याने आरक्षण काढण्यात आले. या आरक्षणातही आधीप्रमाणेच विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांच्या पदरी निराशाच आली. बोदवड नगरपंचायतीवर नव्या आरक्षणाप्रमाणे आता महिलाराज येणार आहे तर इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांना आता सौभाग्यवतींना पुढे करण्याचा पर्याय उरला आहे.

यांच्या उपस्थितीत निघाले आरक्षण
बोदवड तहसील कार्यालयात प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार प्रथमेश घोलप व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. विद्यमान नगरसेवक विविध विकासकामांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र आता महिला आरक्षणामुळे त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आले तर सौभाग्यवतींना पुढे करण्याचा पर्याय मात्र उरला आहे.

सुधारीत प्रभागनिहाय आरक्षण असे
प्रभाग क्रमांक एक- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक दोन- नागरीकांचा मागास प्रवर्गसर्वसाधारण (ओबीसी), प्रभाग क्रमांक तीन- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी), प्रभाग क्रमांक चार- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक पाच- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक सात- अनु.जमाती, प्रभाग क्रमांक आठ- अनु.जाती, प्रभाग क्रमांक नऊ- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक दहा- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक अकरा- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक बारा- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक तेरा- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक चौदा- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक पंधरा- नागरीकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक सोळा- सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक सतरा- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला