बोदवडला महिलेचा विनयभंग : नगरपंचायतीच्या कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा

0

बोदवड : शहरातील एका भागातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी तथा बोदवड नगरपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर सीताराम फाटे याच्याविरूद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 8 रोजी मध्यरात्री ही घडली. 8 रोजी रात्री पीडीता अंगणता झोपली असताना आरोपीने विनयभंग करीत पळ काढला. आरोपीविरुद्ध विनयभंग तसेच अ‍ॅट्रासिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी सुरेश जाधव करीत आहेत.