बोदवडला छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन

0

बोदवड : छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम शंभू प्रेमींकडून जिजाऊ बाल उद्यानात झाला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अ‍ॅड.रवींद्र पाटील व मुख्य कार्य अधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. संभाजीराजांच्या जीवनावर संजय काकडे, चेतन तांगडे, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, रवींद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शंभू चरीत्रातून शिकावा प्रयत्नवाद
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी या संकट समयी हताश, निराश न होता मोठ्या आत्मविश्वासाने संकटांविरुद्ध लढण्याची प्रेरणा शंभूचरीत्रातून घ्यावा, आजचा तरुण हतबल, निराश होत चालला आहे, आजच्या तरुणांपेक्षा कितीतरी अधिक संकटे राजांच्यावर आली होती, त्याप्रसंगी राजांनी निर्भीडपणे संकटांवर मात केली. संभाजीराजे प्रयत्नवादी होते, निराशावादी नव्हते. शंभूचरीत्रातून आज आपण प्रयत्नवाद शिकला पाहिजे, असा सूर मान्यवरांनी भाषणातून व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, तहसीलदार रवींद्र जोगी, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत भोसले, संभाजी ब्रिगेडचे महेंद्र पाटील, रोशन पाटील, संजय काकडे, चेतन तांगडे, संभाजी जाधव, शिवसेनेचे गजानन खोडके, नगरसेवक देवेंद्र खेवलकर, संजय वराडे, नईम खान, पत्रकार अमोल न्हावी, निवृत्ती ढोले उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीसाठी जयदीप शेळके, सुरज पाटील, शैलेश वराडे, संदीप देवकर, कोमल दादडे आदींनी परीश्रम घेतले.

Copy