बोदवडला गायीची चोरी : एकाविरुद्ध गुन्हा

0

बोदवड : शहरातील रवींद्र जयराम गायकर (28) यांच्या मालकिची 15 हजार रुपये किंमतीची गाय 7 रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास संशयीत आरोपी कैलास पंडित नेरकर याने लांबवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी कैलास पंडित नेरकर याच्याविरुद्ध बोदवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार विलास महाजन करीत आहेत.