बोदवडमध्ये मोकट कुत्र्यांचा धुमाकूळ : बालिकेवर हल्ला हल्ला

0

बोदवड : शहरात मोकाट कुत्र्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीती पसरली असून या कुत्र्यांनी सोमवारी चार ते पाच बालकांना चावा घेतल्याने पालकवर्गात भीती पसरली आहे. जामठी रस्त्यावर राहणार्‍या ईरम फातेमा इमरान मणियार (9) या मुलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करीत तिला जखमी झाल्याची घअना सोमवारी घडली. काही कुत्रे पिसाळलेले अससून अनेकांना खरुज व खोलवर जखमा झाल्या आहेत.

नगरपंचायत प्रशासनाने घ्यावी दखल
जामठी रस्त्यावरील रहिवासी असलेल्या नऊ वर्षीय बालिकेवर चार ते पाच कुत्र्यांनी हल्ला चढवल्याने बालिका जखमी झाली आहे. कुत्र्यांनी हल्ला चढवताच बालिकेने आरडा-ओरड केल्यानंतर पालकांनी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावण्यात आले. बालिकेच्या पाठीवर व कानाजवळ मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. जखमी बालिकेला जननायक फाऊंडेशनचे सदस्य असलेले जाफर मण्यार यांनी ग्रामीण रुग्णालयात नेत पुढे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकामी दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.