बोदवडमध्ये बिल्डींग मटेरीयलच्या दुकान फोडून सहा लाखांची रोकड लंपास

बोदवड : शहरात चोरट्यांचा उच्छाद कायम असून सोमवारी मध्यरात्री बिल्डींग मटेरीयलच्या दुकानाचे शटर उचकावून चोरट्यांनी तब्बल सहा लाखांची रोकड लांबवल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी प्रमोद सुरेश बडगुजर (35, रा.शिवद्वार जवळ, बोदवड) यांनी बोदवड पोलिसात फिर्याद दिली. बडगुजर यांचे भुसावळ रस्त्यावर बडगुजर ट्रेडर्स नाम बिल्डींग मटेरीयलचे दुकान असून सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावत दुकानात प्रवेश केला व ड्रावरमध्ये ठेवलेली तब्बल सहा लाखांची रोकड लांबवली. चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. तपास उपनिरीक्षक शरद माळी करीत आहेत.

Copy