Private Advt

बोदवडमध्ये धाडसी घरफोडी : दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

बोदवड : बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील बारभाई गल्ली प्रभाग क्रमांक 13 मध्ये विशाल सुरेश जैस्वाल (28) वास्तव्यास आहेत. 7 ते 9 सप्टेंबरदरम्यान कुटुंब गावाला गेल्याने चोरट्यांनी संधी साधली.

या ऐवजावर मारला डल्ला
चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 16 हजार रुपये किंमतीचे 29 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, 20 हजार व 16 हजार रुपये किंमतीच्या दोन अंगठ्या, 12 हजार रुपये किंमतीचा तीन ग्रॅम वजनाचा डायमंड खडा असलेली अंगठी, 18 हजार रुपये किंमतीची 4.5 गॅ्रम वजनाची सोन्याची मांगटिका, 2000 रुपये किंमतीचे सोन्याचे मणी, सहा हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या रींगा, तीन हजार 500 रुपये किंमतीचे सात भार वजनाचे चांदीचे कमरबंद, एक हजार पाचशे रुपये किंमतीची तीन भार वजनाची पायातील तोरडी, एक हजार रुपये किंमतीचे दोन भार वजनाचे पायातील बिचवे मिळून एक लाख 96 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लांबवले. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.