Private Advt

बोदवडमध्ये ढोल बजावो आंदोलनाद्वारे प्रशासनाचे वेधले लक्ष

प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थींचे रखडले हप्ते

बोदवड : नगरपंचायतीमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या हप्त्यांच्या निषेधार्थ नईम खान यांच्यासह लाभार्थींनी बुधवारी नगरपंचायतीसमोर ढोल वाजवा आंदोलन करून प्रशासनाला जाग येण्यासाठी आर्जव केले.

लाभार्थींना अनुदानाची प्रतीक्षा
प्रधानमंत्री योजनेचा लाभ घेतलेल्या काही लाभार्थींनी आपल्या घराचे काम पूर्ण केले आहे व काही लाभार्थींनी कर्ज घेऊन काम पूर्ण केले असतानाच लाभार्थींना अद्यापही पैसे न मिळाल्याने त्यांची मोठी परवड होत आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ बोदवड नगरपंचायतीच्या समोर ढोल बजावो आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्याची व मुख्याधिकार्‍यांची राष्ट्रवादीचे गटनेते जफर शेख, नगरसेवक मुज्जमील शाह, लतीफ शेख, हकीम बागवान यांनी मध्यस्ती करत लाभार्थींच्या अडचणीवर लक्ष देऊन लवकरात-लवकर लाभार्थींच्या बँक खात्यात हप्ते वाटप करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नईम खान बागवान, ऐनूर ठेकेदार, महमूद, राजू टेलर, लखन माळी, लुकमान पिंजारी, समशेर ड्रायव्हर यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.