Private Advt

बोदवडमध्ये डंपरच्या चेसीस क्रमांकात हेराफेरी : दोघांविरोधात गुन्हा

बोदवड शहरातील प्रकार : वाहन तपासणी करताना आरटीओ अधिकार्‍यांनी लक्षात आणून दिली बाब

बोदवड : तहसील कार्यालयात जमा करण्यात आलेल्या डंपरचा चेसिस क्रमांक बदलवण्यात आल्याप्रकरणी वाहन चालक सुरेश भोई व शरद भागवत पाटील यांच्याविरोधात तलाठी मंगेश पारीसे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अवैध ऊत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी दोन लाख 68 हजार 367 रुपयांचा दंड संबंधिताना सुनावण्यात आल्याने अवैध गौण खनिजाची वाहतूक करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळउ उडाली आहे.

मॅपचे उल्लंघण केल्याने कारवाई
बोचवड तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीला लगाम घालण्यासाठी तहसिल कार्यालयाचे पथक गस्तीवर असतांना बुधवार, 12 जानेवारी रोजी शेलवड ते सुरवाडे रोडवर पळासखेडा बुद्रुक नजीक रात्री नऊच्या सुमारास वाळुने भरलेले डंपर (एम.एच.19 वाय.4464) आढळून आले. वाहन चालकाला वाळु वाहतुकीची पावती मागितल्यानंतर त्याने पावती सादर केले व पावतीची महा मायनिंग प्रणालीवर तपासणी केली असता वाळु वैध आढळून आली परंतु जीपीएस मॅप नुसार तपासणी केली असता सदरील वाहन निर्धारीत रस्त्याने जात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनधारकांना मॅपचे उल्लंघण केले असल्याने सदरचे वाहन तहसील कार्यालयाच्या आवारात पुढील कार्यवाहीसाठी जमा करण्यात आले होते.

वाहन तपासणीदरम्यान गैरप्रकार उघड
डंपर वाहन तपासणी कमी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी दिलेल्या आदेशानुसार वायुवेग पथकातील अधिकारी सुनील गुरव हे रविवार, 23 जानेवारी रोजी तपासणीसाठी तहसील कार्यालयात आले. कार्यालय बंद असल्याने वाहनाचे वजन करण्यासाठी वाहनाची चाबी व वाहनचालक उपलब्ध नसल्याने तहसीलदार योगेश्वर टोपे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देण्यात येताच ते कार्यालयात दाखल झाले. डंपर क्रमांक (एम.एच.19 वाय.4464) व चेसीस क्रमांक एफएनई 656812 याचा फोटो तहसीलदार योगेश्वर टोपे यांनी काढला. नंतर सोमवार., 24 रोजी वाहनाचे वजन करण्यासाठी तसेच पुढील चाकाचे पंचर काढण्यासाठी चालक व मालक यांची वाट बघितली परंतु न आल्याने वाहनाचे मोजमाप करून तपासणी केली असता सदर वाहनाचा क्रमांक (एम.एच.19 वाय.4464) आढळला परंतु वाहनाचा चेसीस बदललेला आढळून आला. आरटीओ अधिकारी सुनील गुरव यांनी ही बाब तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी वाहन चालक सुरेश भोई व शरद भागवत पाटील गुन्हा दाखल करण्यात आला.