Private Advt

बोदवडमध्ये कोरोना लस न घेता मिळवले बोगस प्रमाणपत्र : 45 जणांविरोधात गुन्हा

बोदवड : शहरातील 45 जणांनी कोरोना लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी शहरातील 45 जणांविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, 31 डिसेंबर रोजी एनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कपिल पवार यांनी पथकासह बोदवड शहरातील दत्त कॉलनी, उर्दू शाळा परीसर या भागात लसीकरण मोहिम राबवली. अवघ्या दोन तासात त्यांनी 98 जणांचे लसीकरण झाल्यानंतर शासकीय ऑनलाईन रजिस्टरमध्ये नोंद केली मात्र नंतर ऑनलाईन आकडेवारी पाहिली असता लसीकरण तब्बल 144 नागरीकांचे झाले असल्याचे दिसून आले तर आरोग्य सेविकांच्या रजिस्टरमधील नोंदी तपासल्या असता 98 नागरीकांनी लस घेतल्याची नोंद आढळली यामुळे ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये 45 जणांची नावे लसीकरण न करताच फीड केल्याचे दिसून आले. अज्ञाताने पोर्टल हॅक केल्याने की कुणाच्या सहभागाने हा गंभीर प्रकार घडला याची सखोल चौकशीची मागणी होत आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी एनगाव आरोग्य अधिकारी कपिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 45 नागरीकांविरुद्ध बोदवड स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी शेख वसीम शेख शफी बागवान, इशरत मुख्तार बागवान, सुफियांना शेख सिकंदर पिंजारी, शबुग्ता परवीण अब्दुल रहेमान बागवान, शेख मोहसीन शेख रफिक, पूनम रवींद्र सोनवणे, शाहीन बी.शेख आसीफ, रुबीनाबी सई हारुण बागवान, नसरीन शे.नाजीम पिंजारी, हाज्जाबी शेख अब्दुला बागवान, शेख इमरान शेख रफिक मण्यार, मंदा श्रावण भोई, सायदा बी.असलम बागवान, नाजेमा परवीण जावेद सैय्यद, शाहरुख रफिक शेख, सायेमा वसीम बागवान, मुस्कान बी.वसीम बागवान, सोफिया बी.शेख रफिक, सुभाष गजानन मोरे, शबाना इक्बाल बागवान, शोयब अहेमद शेख अय्युब, रीजमीन कौसार जाबीर खा, 23 नुरसत परवीन शेख बागवान, प्रवीण अनिल उगले, इक्बाल अब्दुल सत्तार बागवान, शेख हरुण शेख हसन, शेख असीफुद्दीन अल्लाउद्दीन, सैय्यद अस्लम सैय्यद रशीद बागवान, प्रमोद प्रकाश जवरे, फातेमा मुख्तार बागवान, रुक्सार परवीन गुफरान अहेमद, खातुस्बी शेख हामीद मन्सार, वसीम रऊफ बागवान, शेख लतीफ शेख शफी, फराना अंजुम शेख लतीफ बागवान, शेख मुक्तर अब्दुल सत्तर बागवान, गुफराण अहमद शेख अब्दुल्लाह, शेख आसीफ शेख इब्राहिम बागवान, अकिया निसार बागवान, शंकर रामकृष्ण कारले, अहमद शेख रसुला मण्यार, रवींद्र सोमा सोनवणे, सय्यद हरून सय्यद रशीद बागवान, शेख फिरोज शेख रफिक मण्यार व एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.