Private Advt

बोदवडमध्ये इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

बोदवड : केंद्रातील भाजपा सरकारने घरगुती वापराच्या गॅस, खाद्य तेल आणि डिझेल, पेट्रोलच्या केलेल्या विक्रमी दरवाढीच्या निषेधार्थ बुधवारी बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली तसेच बाजार समिती ते तहसील कार्यालय दरम्यान वाहने ढकलत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

यांचा मोर्चात सहभाग
या मोर्चात राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, तालुकाध्यक्ष डॉ.उद्धव पाटील, मधुकर राणे, कैलास चौधरी, रामदास पाटील, सईद बागवान, दीपक झांबड, सागर जैस्वाल, विजय पालवे, सुभाष पाटील, दीपक वाणी, सुरेंद्र पाटील, दिनेश माळी, महिला तालुकाध्यक्ष वंदना पाटील, डॉ.काजळे, डॉ.आतीष चौधरी, वामनराव ताठे, प्रदीप बडगुजर, विजय चौधरी, रवींद्र खेवलकर, विनोद कोळी, प्रमोद धामोडे, सम्राट पाटील, गोपाळ गंगातीरे, कल्पेश शर्मा, सतीश पाटील, कडू माळी, समाधान बोदडे, दिलीप पोळ, अक्षय चौधरी, भगतसिंग पाटील, विजय पाटील, श्रावण बोदडे, संदीप घडेकर, सुमेर राजपूत, बंटी गुरचळ, कृष्णा पाटील, प्रकाश पाटील, हर्ष कोटेचा, गणेश चौधरी, जीवन राणे, गणेश पाटील, श्याम सोनवणे, अनंता पाटील, आकाश फाटे, किरण वंजारी, मधुकर पाटील, निलेश पाटील, सतीश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, कालू मेम्बर, शेख सलाम, हकीम बागवान, रीतीक पाटील, नितीन बोरोले, गणेश ढाके, सुमेर गुरचळ, ईजहार शेख, नितीन चव्हाण, शेख अजीज, जावेद बागवान व सर्व सेलचे तालुकाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने सहभागी झाले.