बोदवडमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन

0

बोदवड : शहरातील तहसील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या न.ह.रांका शाळेसमोर गुरूवारी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवभोजन थाळी योजना केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळेस सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत गरजू व निराधारांसाठी दररोज 12 ते 3 यावेळेत केवळ पाच रुपयात शिवभोजन थाळी देण्यात येणार आहे.

आमदारांच्या प्रयत्नांना यश
राज्यातील तालुकास्तरावरील पहिली शिवभोजन थाळी मुक्ताईनगरमध्ये सुरू झाल्यानंतर बोदवड शहरातही शिवभोजन थाळी योजना सुरू व्हावी यासाठी आमदार चंद्रकांत पाटील प्रयत्नशील होते. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुक्ताईनगर मतदार संघात एकही निराधार, गरजू गोरगरीब उपाशी राहणार नाही यासाठी पाच रुपयात जेवण ही संकल्पना या मागची आहे. त्यासाठी बोदवड शहरात 75 थाळ्या मंजूर झाल्यावर उद्घाटनाप्रसंगी शिवभोजन केंद्रामार्फत गरजू व निराधार लोकांना याचा लाभ मिळावा यासाठी भोजनचालक शांताराम कोळी यांनी विशेष काळजी घेण्यासंदर्भात सुचना आमदारांनी केल्या.

गरजूंना घरपोच देणार जेवण
तालुक्यातील कोणत्याही गावात गरजू, निराधार व दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांनी शिवभोजन केंद्राला संपर्क करावा तसेच त्यांना जेवणाचे पार्सल घरपोच पोहोचविण्यात येणार असल्याचे शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी यांनी यावेळेस सांगितले. यावेळी तहसीलदार रवींद्र जोगी, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, जिल्हा परीषद नियोजन समिती सदस्य अ‍ॅड.मनोहर खैरनार उपस्थित होते. माजी सभापती विरेंद्रसिंग पाटील, डॉ.उद्धव पाटील, शिवसेना मुक्ताईनगर शहर संघटक वसंत भलभले, दीपक पवार, नगरसेवक आनंदा पाटील, तालुकाप्रमुख गजानन खोडके, नगरसेवक दीपक झांबड, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक देवेंद्र खेवलकर, ईश्वर जंगले, प्रमोद धामोळे, कलिम शेख, दीपक माळी, सुभाष देवकर , धनराज गंगतीरे, गोपाल पाटील, पंकज वाघ, नईम खान तसेच शहरातील विविध लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवभोजन केंद्राला भेटी दिल्या.

गरजूंना संपर्क साधण्याचे आवाहन
तालुक्यातील गावांत निराधार व गरजू व्यक्ती असल्यास खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शांताराम कोळी- 75886 86949
नईम खान- 9096169313
गोपाळ पाटील- 9765100812
कलिम शेख- 9730636313
पंकज वाघ – 9503087494

Copy