बोदवडमधील मनोज वाईन शॉपचा परवाना रद्द

0

बोदवड : संचारबंदीच्या काळात सुरुवातीला साथरोग नियंत्रण प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गर्दीच्या ठिकाणांना बंदी घातल्याने मद्य विक्री दुकाने बंद होती परंतु दारुची चोरट्या पद्धतीने जास्त दरात विक्री करण्यात आली तर जिल्हाधिकार्‍यांच्या नियमांचे सर्रास उल्लंघण मद्य विक्री करणे जिल्ह्यातील वाईन शॉपी परवानधारकांना चांगलेच महागात पडले आहे. गुरुवार, 28 रोजी बोदवडमधील मनोज वाईन शॉपचा परवाना रद्द करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून गर्दीच्या ठिकाणांवर साथरोग नियंत्रण प्रतिबंधात्मक कायद्यान्वये निर्बध लादण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री दुकानांना 3 मे पर्यंत बंदचे आदेश जिल्हाधिकार्‍यांकडून देण्यात आले होते परंतु काही मद्य परवानाधारकांकडून नियम धाब्यावर बसवत दारुची तिप्पट दराने विक्री करणे सुरू होते. या संदर्भातील तक्रारी आमदार चंद्रकांत पाटील यांना येताच त्यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना याबाबत कळविताच 31 मार्च रोजी बोदवड तालुक्यातील मद्य विक्री दुकाने सील करण्यात आली होती. यानंतर मद्यविक्रीस शासनाकडून परवानगी देण्यात आल्यावर सील लावलेल्या दुकानांची स्टॉक तपासणी 5 मे रोजी अधिकार्‍यांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर बोदवड शहरातील मनोज वाईन शॉपच्या 5 मे रोजीच्या स्टॉक तपासणीत मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने परवाना रद्द करण्याची कारवाई जिल्हाधिकार्‍यांकडून करण्यात आली. संचारबंदीच्या काळात तिप्पट दराने मद्य विकणे संबंधित परवानधारकास चांगलेच महागात पडले आहे.