Private Advt

बोढरे शिवारातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील मोठे बोढरे शिवारातून एकाची 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी जळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्रामीण भागातही चोरटे सक्रिय
लखन कपूरचंद जाधव (25, रा.मोठे बोढरे, ता.चाळीसगाव) हा तरुण सोलर कंपनीत मजूरी म्हणून कामाला आहे. शनिवार, 23 एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बोढरे शिवारातील शेत गट नंबर 290 येथील लिंबाच्या झाडाखाली त्याची दुचाकी (एम.एच. 19 डी.एच.9521) क्रमांकाची दुचाकी पार्क केली मात्र चोरट्यांनी ती लांबवली. याबाबत लखन जाधव यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक संदीप माने करीत आहे.