बॉलीवूड दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन

0

जयपूर: ‘प्यार तूने क्या किया’, ‘रोड’, ‘लव इन नेपाल’, ‘उम्मीद’ या सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन झाले आहे. किडनी निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. जयपूर येथे राहत्या घरी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मूत्रपिंडासंबंधीत तक्रारी जाणवू लागल्यामुळे त्यांना एप्रिलमध्येच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यानंतर मे महिन्यात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु, अखेर १८ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Copy