बेवारस मयत वृध्द निघाला जि.प.चा सेवानिवृत्त लेखापाल

0

जळगाव- जिल्हा परिषदेच्या पत्री हनुमान मंदिराजवळ बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास वृध्दाचा मृतदेह आढळून आला. अथक परिश्रमांनी शहर पोलिसांनी संंबंधित मयत वृध्दाची ओळख पटविली आहे. व्यंकटेश गौतम मेढे वय 70 असे मयत वृध्दाचे नाव आहे. मयत हे जिल्हा परिषदचे लेखापाल या पदावरुन सेवानिवृत्त झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्हा परिषदेच्या पत्री हनुमान मंदिराजवळ वृध्दाचा मृतदेह असल्याची माहिती एका व्यक्तीने शहर पोलिसांना दिली. त्यानुसार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडका ॅन्स्टेबल संजय भांडारकर यांनी घटनास्थळ गाठले. भांडारकर यांनी केलेल्या चौकशीत संबंधित मयत वृध्दास परिसरात मेढे काका म्हणून नागरिक ओळखत असल्याचे समोर आले. मेढे काय एवढ्यावरुन ओळख पटविण्यासाठी भांडारकर यांनी गणेश पाटील, सचिन वाघ, तेजस मराठे या कर्मचार्‍यांना सोबत घेतले. त्यानुसार परिसरातून माहिती काढली. यात मयताचे पत्नी एका मुलासह पुण्याला वास्तव्यास आहे. तर एक मुलगा अमेरीकत नोकरीला आहे.

जळगावात भारत दूरसंचार विभागात मयताचे भाऊ नोकरीला असल्याची माहिती मिळाल्यावर भांडारकर यांनी संबंधितांचे क्रमांक मिळवून संपर्क साधला. व शहर पोलीस ठाण्यात येण्याच्या सुचना केल्या. यानंतर मयत व ृध्दाचे पूर्ण नाव व्यंकटेश गौतम मेढे असल्याचे निष्पन्न झाले. ते जिल्हा परिषदेत लेखापाल होते, दारुच्या व्यसनामुळे 30 वर्षांपूर्वी त्यांना पत्नी सोडून निघून गेल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पुणे येथील त्यांचा मुलाशी संपर्क साधला असून ते जळगावकडे रवाना झाले आहेत. व्यंकटेश गौतम यांच्या पश्‍चात पत्नी सुमेधा, मुलगी संजिवनी, मुलगा आतिश, अमोल असा परिवार आहे. आतिष हा अमेरीकेला असल्याचे समजते.

Copy