बेवत्ता अपंग शेतमजुराचा विहिरीत आढळला मृतदेह

यावल : तालुक्यातील चितोडा येथील अपंग शेतमजूर युवराज काशीनाथ कोलते (40) यांचा यावल शिवारातील देवीदास पाटील यांच्या शेतातील विहिरीत नुकताच मृतदेह आढळला. कोलते यांनी आत्महत्या केल्याचा संशय असून पोलिसांकडून त्या दृष्टीने चौकशी सुरू आहे. 27 मार्च कोलते हे सकाळी यावल येथे दवाखान्यात जात असल्याचे सांगून निघाले मात्र न परतल्याने त्यांचा शोध सुरू असतानाच त्यांचा मृतदेह विहिरीत आढळला शिवाय त्यांचा शर्ट विहिरीच्या कठड्यावर आढळल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. युवराजचा चुलत भाऊ मनोज पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.