बेळगाव महापौरपदी संज्योत बांदेकर

0

बेळगाव । बेळगाव महापौरपदाच्या निवडणूकीत मराठी भाषिकात दोन गट झाले होते.दोन्ही एकत्र आल्याने बेळगाव महापौरपदी मराठी भाषिक संज्योत बांदेकर यांचा 15 मतांनी विजय झाला. तर नागपूर येथील महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी नंदा जिचकार यांची निवड करण्यात आली आहे. या निवड पक्षाच्या कोअर कमटीकडून शिक्कामार्ताब करण्यात आला.असे असले तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोहोर लागायची बाकी असल्यामुळे अधिकृत घोषणा करण्यास विलंब झाला.

मराठी भाषीकांचे गट एकत्र झाल्याने वर्चस्व
बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर निवडणूकीत मराठी भाषिकात 22 नगरसेवकांचा एक आणि 10 नगरसेवकांचा एक असे गट झाले होते. या महापौर पदाच्या निवडणूकीत संज्योत बांदेकर व मधुश्री पुजारी याच्या नावाची चर्चा होती.त्यामुळे महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र दोन्ही मराठी भाषिक गट एकत्र आल्याने 1 मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत संज्योत बांदेकर यांचा सहज विजय झाला.महापौर पदाचा उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार आमदार संभाजी पाटील यांना देण्यात आला होता.महापौर पद ओबीसी महिलांसाठी राखीव होते. तर उपमहापौर पद खुल्या प्रवर्गासाठी होते. तर नागपूर महापालिकेत भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले आहेत. महापौरपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात नंदा जिचकार यांचे नाव सर्वात आघाडीवर होते.त्याच्यानावावर शिक्का मोर्ताब झाला आहे. उपमहापौरपदी दिपराज पार्डीकर यांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव तर सत्तापक्षात संदीप जोशी यांची निवड झाली आहे.