बेरोजगार हॉटेल कामगारांचे पुनर्वसन करण्याची मागणी

0

यावल। सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार महामार्गालगतीची दारुची दुकाने बंद झाली. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्यामुळे शेकडो हॉटेल्समधील कामगार बेरोजगार झाले आहेत. या कामगारांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने व्हीटीपी समुपदेशन व्यावसायिक मार्गदर्शन, प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देत पुनर्रोजगार द्यावा, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक डॉ. कुंदन फंगडे यांनी आमदार हरिभाऊ जावळे यांना दिले.

नगरसेवक डॉ.फेगडे यांनी आमदार जावळे यांची भेट घेत, हॉटेल कामगारांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती केली. यासाठी त्यांनी दिलेल्या निवेदनात, न्यायालयाच्या आदेशान्वये राज्यमार्गापासून 500 मीटर अंतरावरील सर्व दारू दुकाने, परमीट रुम, बिअरबार एप्रिलपासून बंद झाले आहेत. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. असे असले तरी यामुळे हॉटेलात काम करणारे लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. या कामगारांचे पुनर्वसन त्यांच्या हाताला काम दिल्यास बेरोजगारी दूर होऊ शकते. असे फेगडे यांनी म्हटले आहे.