बेरोजगारीच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटण्यासाठी संसदेत गदारोळ: राहुल गांधी

0

नवी दिल्ली: राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आज लोकसभेत प्रचंड गदारोळ झाले. सत्ताधारी खासदार आणि विरोधकांमध्ये धक्काबुकी झाल्याचा प्रकारही घडला. दरम्यान यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा भाजप आणि मोदींना लक्ष बनविले आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक अधिवेशनात गदारोळ करत असल्याचे आरोप राहुल गांधी यांनी केले. तरुण या सरकारकडे रोजगार देण्याच्या आशेने पाहत आहे, मात्र सरकार तरुणांना रोजगार देण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे आरोप राहुल गांधी यांनी केले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल ‘सहा महिन्यानंतर नरेंद्र मोदी बाहेर निघणार नाही, तरुण त्यांना मारतील’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल गांधींनी मोदींचा एकेरी उल्लेखही केला होता. त्यावरून आज लोकसभेत भाजप खासदारांनी गदारोळ केला. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी केली.