Private Advt

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरण ; माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी नोंदवला जवाब

मुंबई : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना मुंबई पोलिसांनी गुरुवारी हजर राहण्यास सांगितल्यानंतर गुरुवारी खडसे यांनी कुलाबा पोलिसात जवाब नोंदवला.

रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा
वरीष्ठ पोलिस अधिकारी राजीव जैन यांच्या तक्रारीवरून शुक्ला यांच्या विरोधात मार्च महिन्यात कुलाबा पोलिस ठाण्यात कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. शुक्ला यांनी भाजपचे माजी नेते आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या फोन नंबरवर पाळत ठेवल्याचा आरोप जैन यांनी केला होता. खडसे यांना गुरुवारी दक्षिण मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आल्यानंतर गुरुवारी दुपारी खडसे यांनी आपला जवाब नोंदवला.

कुलाबा पोलिसात दाखल आहे गुन्हा
दक्षिण मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी असलेल्या रश्मी शुक्ला यांनी 2019 मध्ये या दोन नेत्यांचे फोन टॅप केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी खडसे भाजपचे सदस्य होते. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्ला यांना पुण्यात दाखल झालेल्या अशाच एका प्रकरणात अटकेतून सूट दिली आहे. अतिरीक्त पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍याच्या तक्रारीच्या आधारे, शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.