बेकायदा दारूची विक्री : भुसावळात एकास अटक

0

भुसावळ- विना परवाना देशी दारूची विक्री करणार्‍या नीलेश मधुकर गावंडे (33, रा.खडका, ता.भुसावळ) यास 22 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास नाहाटा चौफुली भागातून अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून एक हजार 560 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, सुनील थोरात, दीपक जाधव, कृष्णा देशमुख, नीलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, योगेश माळी, विनोद वितकर, चालक तस्लीम पठाण आदींच्या पथकाने केली.

Copy