बॅडमिंटन स्पर्धेत श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मुलींचा संघ उपविजयी

0

भुसावळ- डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अंतर्गत विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मुलींचा संघ उपविजयी ठरला आहे. 28 ते 29 सप्टेंबर 2018 दरम्यान जळगाव येथील केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रज्ञा बाळू पाटील, जागृती राजू पाटील, योगेश्वरी श्याम सारसर, मानसी दीपक रोटे, निकिता नंदकुमार मिस्त्री यांचा संघ उपविजयी ठरला. क्रीडा शिक्षक प्रा. योगेश जोशी यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. हिंदी सेवा मंडळ अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधूलता शर्मा, कोषाध्यक्ष महेशदत्त तिवारी यांनी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले. विभागप्रमुख प्रा.सुधीर ओझा, प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.राहुल चौधरी, प्रा.योगेश जोशी यांनी उपविजयी संघाचा महाविद्यालयात सत्कार केला.

Copy