बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची महेंद्रसिंग धोनीवर मात

0

मुंबई । भारतात सर्वाधिक क्रिकेटप्रेमी आहे. तेथे बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू प्रसिध्दीच्या शिखरावर आहे. तिने एक पाऊल पुढे टाकत जाहिरातीच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. जाहिरात क्षेत्रात सिंधूने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णणार माही उर्फ महेंद्रसिंग धोनी याच्यावर मात केली आहे. सिंधूला माहिपेक्षाही जास्त मानधन मिळत आहे.

गतवर्षी रिओ ओलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलेल्या सिंधूने जाहिरातीचे मानधन मिळविणार्‍या यादीत कर्णधार विराट कोहलीच्या मागे आहे. तर सिंधूची ब्रॅण्ड व्हॅल्यू ही सानिया मिर्झा व सानिया नेहवालपेक्षा जास्त झाली आहे. सिंधू महिला खेळाडू पेक्षा पुढे आहे. बॅन्डसोबत तिचा करार जास्तीत जास्त काळ राहील. असे प्रयत्न करत असल्याचे तुहिन मिश्रा हिने सांगितले. सिंधूच्या सगळ्या जाहिरातीचे मानधन एक ते सव्वा कोटी आहे. तर विराट कोहलीचे दोन कोटी आहे.सिंधूने गेल्या पाच महिन्यात तीस कोटीचे करार केले आहे.