बुध्द पौर्णिमेनिमित्त शुध्दोधन कॉलनीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

धुळे । शुध्दोधन कॉलनीत भीमबुध्द सिल्व्हर समितीतर्फे बुध्द पौर्णिमेनिमित्त दि.10 रोजी सायंकाळी 7 वाजता दीपप्रज्वलन, बुध्द वंदनेसह खीरदान, अन्नदान वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अध्यक्ष अर्जून पवार यांनी केले आहे. यशस्वीतेसाठी भीमबुध्द सिल्व्हर समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू पवार, अध्यक्ष अर्जून पवार, नितीन जमदाडे, बुध्दराज बैसाणे, रियाज अली, दीपक खैरनार, नितीन दामोदर, अनिल पाटील, गौतम पारेराव, गोटू वाणी, पुरुषोत्तम गरुड, रवींद्र पवार, सुनील बैसाणे, अनिल नवगीरे, योगेश अरोरा, अब्दुल किदवाई, राजश्री पवार, वहिदा किदवाई, मंगलबाई पारेराव, उषा बेडसे, आम्रपाली पवार आदी परिश्रम घेत आहेत.

सामुदायिक बौध्दवंदना
भगवान गौतमबुध्द यांच्या जयंतीनिमित्त दि.10 रोजी सकाळी 9 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सामुदायिक बुध्दवंदनेचा कार्यक्रम आयोजित केला असून सर्व आंबेडकर अनुयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन एम.जी.धिवरे, प्रा.बाबा हातेकर, संजय पगारे, राहुल धिवरे आदींनी केले आहे.