बुकिंगनंतर रेल्वे तिकीट घरी आल्यावर द्या पैसे

0

नवी दिल्ली। भारतीय रेल्वेने जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध योजना आखलेल्या आहेत. आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक अशी योजना आणली आहे, ज्यामुळे लोक तिकीट उधार घेऊ शकतात. आता रेल्वेचे तिकीट बिना पैसे खर्च करताही ऑनलाइन मिळतील. त्यानंतर तिकिटाची होम डिलिव्हरीही केली जाईल. विशेष म्हणजे घरी तिकीट मिळाल्यानंतर ग्राहकांना सदर तिकीटाचे पैसे देण्याची मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान, या सेवेसाठी लोकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. या सेवेसाठी खठउढउ ने 600 शहरांमध्ये पे ऑन डिलिव्हरी नावाने सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेविषयी खठउढउ च्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, ही सुविधा अशा लोकांसाठी आहे ज्यांना ऑनलाइन तिकीट, तर बुक करण्याची इच्छा आहे. परंतु, ऑनलाइन पेमेंट करण्यास धजत नाहीत. अशा लोकांना त्यांच्या घरीच तिकीट पाठवले जाईल आणि तिकिटाचे पैसे रोख स्वरुपात डिलिव्हरीच्या वेळी देऊ शकतील. ही सुविधा चार हजार पिन कोड असणार्‍या शहरांमध्ये लागू करण्यात आली आहे. आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, आयआरसीटीसीने आपले संकेतस्थळ आणि मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पे-ऑन-डिलिव्हरी (पीओडी)ची सुरुवात केली आहे.