बीसीसीआयची मुंबईत पार पडली पहिली बैठक

0

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआय प्रशासकांच्या संचालन समितीने मंगळवारी पहिल्या बैठकीचे आयोजन करीत बीसीसीआयच्या कामकाजाची माहिती घेतली. बीसीसीआय मुख्यालयापासून दूर बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्समधील आयडीएफसी बँक परिसरात पार पडलेल्या या बैठकीला माजी नियंत्रक व महालेखाकार विनोद राय, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी, तसेच विक्रम लिमये उपस्थित होते.

चौथे प्रशासक गुहा यांची उनुपस्थिती
चौथे प्रशासक प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा अनुपस्थित राहिले. समितीचे प्रमुख राय यांनी बाहेर प्रतीक्षेत असलेल्या पत्रकारांशी संवाद साधताना काम सुरू करण्यापूर्वी ही पहिली बैठक असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे संचालन, तसेच लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबाजावणी करण्यासाठी राय यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती कालच नेमली. बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी समितीला रिपोर्ट करतील, असेही न्यायालयाने बजावले होते. दरम्यान, बीसीसीआयच्या संचालनाची माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही बैठक आयोजिली होती. आम्ही भविष्यातील कामाला लवकरच सुरुवात करणार असल्याची माहिती विनोद राय यांची बोलतांना सांगितले.