बीपीएल पासून वंचितांचा मनपासमोर उपोषण

0

जळगाव : महानगरपालिकेतर्फे शहरातील नागरी गरीब कुटुंबाचा सर्वेक्षण न केला गेल्यामुळे गरिबांना दारिद्र रेषेखाली असल्याचा प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. 2011-16 पर्यत वेळोवेळी बीपीएल प्रमाणपत्रासाठी नागरिकांनी मनपाकडे अर्ज केलेला असून अद्यापही त्यांना प्रमाणपत्राचे वाटप केले गेले नसल्याने गरीब कुटुंबांनी सोमवार 9 पासून मनपा इमारतीसमोर उपोषण सुरु केले आहे.
2005-06 यावर्षी तयार करण्यात आलेले बीपीएल प्रमाणपत्र 2010मध्ये वाटप करण्यात आले त्यावेळी गरीब कुटुंबाला प्रमाणपत्र वाटप करण्यात आले नव्हते. शहरातील शिवाजी नगर, शनिपेठ, दालफड, गवळीवाडा, निमखेडी, सावखेडा, पिंप्राळा हुडको येथील नागरीक उपोषणासाठी बसले आहे. लवकरात लवकर बीपीएल प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. दगडू भिकन, एकनाथ सरोदे, अरमान शाह, राहूल गुरव, अरुण बारी आदींसह महिला उपोषणकरीत आहे.