Private Advt

बीएचआर घाेटाळा : १०२ वर्षांच्या वृद्धाची न्यायालयात साक्ष

जळगाव – बीएचआर पतसंस्था अार्थिक घोटाळा प्रकरणात संचालकांविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात बुधवारी १०२ वर्षांच्या वृद्धाने साक्ष नोंदवली. सुमारे २५ मिनिटे त्यांची साक्ष झाली. त्यात त्यांनी स्पष्टपणे बोलून न्यायालयाकडे आपबिती सांगितली. 

 

तीन लाख रुपयांच्या ठेवीची रक्कम परत न मिळाल्याने झालेली त्यांची फरपट न्यायालयाने नोंदवून घेतली. बहुधा राज्यातील न्यायालयात एवढ्या वयोवृद्ध व्यक्तीने न्यायालयात हजर राहून साक्ष दिल्याचे हे कदाचित पहिलेच प्रकरण असू शकते, असा दावाही करण्यात येताे अाहे.