Private Advt

बीएचआर अपहारप्रकारणी जळगाव मधील दिग्गजांच्या घरावर छापेमारी; सात जण ताब्यात

पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई

जळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी पहाटे पुन्हा जळगाव शहर, जामनेर, पाळधी, भुसावळ, धुळे, औरंगाबाद, मुंबईसह पुण्यात एकाचवेळी छापेमारी केली. आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे, संजय तोतला, जामनेर पं. स.चे माजी सभापती छगन झाल्टे, जामनेर शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील व तळेगांव येथील कापूस व्यापारी राजेश लोढा, भुसावळ येथील आसीफ तेली, पाळधी येथील जयश्री मणियार आणि प्रेम कोगटा यांना अटक झाली आहे. ही कारवाई पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

पथकाने भागवत भंगाळे यांना मॉर्निंग वॉक करताना पोलिसांनी सहा वाजता झाला घेतले तर भुसावळ येथे माजी उपनगराध्यक्षला ताब्यात घेण्यात आलेले आहे. जामनेरला पंचायत समितीच्या माजी सभापतीला ताब्यात घेण्यात आलेले आहे. कोगटा ग्रुप उद्योगसमूहाचे डायरेक्टर प्रेम कोगटा यांना पुण्यातुन अटक करण्यात आली आहे. तर प्रितेश जैन यांना धुळे, अंबदास मानकापे यांना औरंगाबाद तर जयश्री तोतला यांना मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले आहे. जळगाव येथे ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व संशयितांना भागवत भंगाळे यांना जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बसवण्यात आलेले आहे इतर सर्व जणांना त्या त्या पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. या कारवाईबाबत कळताच आमदार राजूमामा भोळे, काही राजकीय मंडळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याजवळील भास्कर मार्केटजवळ पोहचून ते परिस्थितीची माहिती घेत आहेत.

पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह दहा जणांवर फसवणूक व्यापाराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच महिन्यात पुणे पोलीस दुसर्‍यांदा जळगावात आले. या कारावाईने जळगाव जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.