बिहार विधानसभा निवडणूक: दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला प्रतिसाद

0

पटना: कोरोना महामारीच्या काळात पहिली सार्वत्रिक निवडूक बिहारला होत आहे. बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान झाले असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज मंगळवार ३ नोव्हेंबरला होत आहे. बिहारसह मध्य प्रदेश, हरियाना, कर्नाटक, ओडीसा, गुजरात येथे देखील पोट निवडणुका होत आहेत. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे मतदानाची टक्केवारी कमी होईल असे बोलले जात होते, मात्र पहिल्या टप्प्यात ५४ टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात आज 17 जिल्ह्यातील 94 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, शिवहर, सीतामढी, मधुबनी, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, सीवान, छपरा, वैशाली, समस्तीपूर, बेगूसराय, खगडिया, भागलपूर, नालंदा आणि पाटणा, या जिल्ह्यांत मतदान होत आहे. दीड हजाराच्या जवळपास उमेदवार नशीब आजमावत आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार, आरजेडी प्रमुख तेजस्वी यादव यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

https://twitter.com/ANI/status/1323475039577018368/photo/2

 

बिहार निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जेडीयू, भाजप एकत्र येऊन ही निवडूक लढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यांनी डझनभर सभा बिहारमध्ये घेतल्या आहेत. भाजप-जेडीयूला आरजेडी, लोजपचे आव्हान आहे. आरजेडीचे तेजस्वी यादव या निवडणुकीत अधिक परिश्रम घेत आहे. दिवसाला १५-१७ सभा तेजस्वी यादव घेत आहेत. तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला होत असून एकत्रित १० नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

Copy