बिहार निवडणुकीचे आज बिगुल वाजणार; आयोगाची पत्रकार परिषद

0

नवी दिल्ली: बिहार निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आज बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजणार आहे. निवडणूक आयोग दुपारी १२.३०वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. मागील विधानसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडली होती. मात्र, यावेळी तीन टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनामुळे यावर्षी होणारी निवडणूक अनेकबाबीने ऐतिहासिक ठरणार आहे.

करोनाच्या संक्रमणानंतर देशातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं यासंदर्भात नियमावली जाहीर केलेली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मतदान कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढवण्यात आलेली आहे. मतदान केद्रांवरील मतदारांची संख्या कमी करून मर्यादित करण्यात आली आहे.

Copy