बिहारसाठी गोरखपूर, पुणे-गोरखपूर विशेष गाड्या सुरू

लॉकडाऊनमुळे मजुरांचा जत्था गावाकडे रवाना : कोरोना नियमांचे पालन करण्याचे प्रवाशांना आवाहन

भुसावळ : बिहार राज्यात जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या चालविल्या जात असल्याने लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर मजुरांचा मोठा जत्था आपल्या गावाकडे रवानाना होता दिसून येत आहे. बिहार राज्यात जाणार्‍या प्रवाशांची गर्दी पहाता रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

विशेष गाडी पनवेलहून गोरखपूरसाठी सुटणार
यात 05186 ही विशेष गाडी 16 व 20 एप्रिलला पनवेल येथून सकाळी 9.15 वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 3.30 वाजता पोहोचणार आहे. 05185 विशेष गाडी 15 व 19 एप्रिलला गोरखपूर येथून रात्री 12.30 वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 6.15 वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, हबीबगंज, झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, गोंडा, बस्ती येथे थांबणार आहे.

पुणे-गोरखपूर विशेष गाडी
01443 ही विशेष गाडी 19, 23 व 27 एप्रिलला पुणे येथून रात्री 9.30 वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्‍या दिवशी पहाटे 6.35 वाजता पोहोचेल. 01444 ही विशेष गाडी 17, 21 व 24 एप्रिलला गोरखपूर येथून रात्री 9.15 वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 6.25 वाजता पोहोचेल. ही गाडी दौंड कॉर्डलाइन, नगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ बीना, झाशी, कानपूर सेंट्रल, गोंडा, बस्ती येथे थांबणार आहे.

उधना-छपरा विशेष गाडी
09087 ही विशेष गाडी 16, 23 व 30 एप्रिलला उधना येथून सकाळी 8.35 वाजता सुटेल आणि छपरा येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 1.20 वाजता पोहोचेल. 09088 ही विशेष गाडी दि. 18, 25 एप्रिल व 2 मेला छपरा येथून रात्री 12.15 वाजता सुटेल आणि उधना येथे दुसर्‍या दिवशी सकाळी सातला पोहोचणार आहे. ही गाडी नंदुरबार, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज चोकी, मिर्जापूर, वाराणसी, जौनपूर, बालिया येथे थांबणार आहे.

सुरत-हटिया विशेष गाडी (7 फेरी )
9081 विशेष गाडी 15 एप्रिल ते 27 मे पर्यंत दर गुरुवारी सुरत येथून दुपारी 2.20 वाजता सुटेल आणि हटियाला दुसर्‍या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता पोहोचेल. 09082 ही विशेष गाडी दि 17 एप्रिल ते 29 मेपर्यत दर शनिवारी हटिया येथून रात्री 12.20 वाजता सुटेल आणि सुरतला तिसर्‍या दिवशी पहाटे चारला पोहोचणार आहे. ही गाडी नंदुरबार, भुसावळ, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउलकेला येथे थांबणार आहे.