बिहारमध्ये १ हजार शेतकरी उत्पादक संस्था स्थापणार: मोदींची मोठी घोषणा

0

समस्तीपूर: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. ३ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तत्पूर्वी प्रचाराने जोर धरला आये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार निवडणुकीत विशेष लक्ष घातले आहे. भाजपने जाहीरनाम्यात अनेक आश्वासन दिले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार सभेच्या माध्यमातून मोठी घोषणा केली. भाजपाने बिहार शेतकऱ्यांसाठी १००० शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने १ लाख कोटींचा निधी तयार केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. समस्तीपूर येथे आज रविवारी त्यांची निवडणूक प्रचार सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मोदींनी विरोधकांवर निशाणा देखील साधला. ‘एकीकडे एनडीए लोकशाहीसाठी प्रतिबद्ध आहे. तर दुसरीकडे ‘परिवार तंत्र गठबंधन’ आहे. एनडीचे सरकार हे ‘सबका साथ, सबका विकास’ वर चालणारी आहे असे मोदींनी संगितले. या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळेल हे निश्चित झाल्याचे मोदींनी सांगितले.

 

Copy