बिहारने घोटाळ्याची हद्दच ओलांडली; ६५ वर्षीय महिलेची १४ महिन्यात आठवेळा प्रसूती

0

पटना: बिहार म्हटले म्हणजे घोटाळेबाज हेच चित्र समोर उभे राहते. आजपर्यंत अशी एकही सरकार बिहारमध्ये नाही की ज्यावर घोटाळ्याचे आरोप झाले. आता तर बिहारने घोटाळ्याची हद्दच ओलांडली आहे. घोटाळा करतांना अशक्य नैसर्गिक गोष्टींचाही भान राहिलेला नसल्याचे उघड झाले आहे. जननी सुरक्षा या सरकारी योजनेमध्ये मोठा घोटाळा उघड झाला आहे. हा घोटाळा करतांना वयाचा आणि नैसर्गिक गोष्टींचाही भान राहिलेला नाही. चक्क एका ६५ वर्षीय महिलेची १४ महिन्यांत ८ वेळा प्रसूती झाल्याचे दाखविण्यात आले असून त्यातून पैसे उकलण्यात आले आहे. एनएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

१४ महिन्यात आठ मुलींना जन्म दिला असून मुलगी झाल्यानंतर मिळणारा प्रोत्साहन भत्ता हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून घोटाळेबाज बिहारची पुन्हा चर्चा झाली आहे. जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी नेमली असून दोन दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. चौकशीनंतर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी सांगितले.

बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्हायातील मुशहरी भागात नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये मिळणारा पैसा हडपण्यासाठी दलालांनी हा घोटाळा केला आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पालकांना ठराविक रक्कम दिली जाते. या घोटाळ्यात दलालांनी कागदावर मुलींची खोटी नावे टाकली व ही प्रोत्साहन रक्कम हडप केली आहे. यामध्ये अनेक अशा महिला आहेत ज्या नैसर्गिक रित्या आई बनू शकत नाहीत. मात्र, त्यांनीच मुलींना जन्माला घातल्याचे यामध्ये दाखविण्यात आले आहे.

65 वर्षांच्या एका महिलेने 14 महिन्यांतच 8 मुलींना जन्म दिल्याचे दाखविण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे या योजनेचे अधिकारी आणि बँकेचे सीएसपी या बनावट कागदपत्रांच्या आधारे या महिलेला पैसे पाठवत राहिले. हा प्रकार उघड होताच, मसुहरीचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी उपेंद्र चौधरी यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Copy