अखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश

0

पाटना: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीमुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे पदावर असतांनाच एकाद्या राजकीय नेत्याप्रमाणे भाष्य करीत होते. अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर टीका करतांना पांडे यांनी राजकीय नेत्याप्रमाणे विधान केले होते. त्यामुळे ते राजकारणात जाणार याची चर्चा सुरु होती. आज रविवारी अधिकृतरित्या बिहारच्या राजकारणात प्रवेश केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये त्यांनी प्रवेश केला. नितीश कुमार यांच्या घरी जाऊन त्यांनी पक्षात प्रवेश केला. ते विधानसभा निवडणूक देखील लढविणार आहेत.

https://twitter.com/ANI/status/1310172284896702467/photo/1

सोमवारी ऐच्छिक सेवानिवृत्ती घोषित केली. त्यानंतर २४ तासांत त्यांचा राजीनामाही मंजुर करण्यात आला. कार्यकाळ संपण्यासासठी अवघे पाच महिने शिल्लक असतानाच त्यांनी सेवानिवृत्ती स्विकारली. त्यांच्या अचानक निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे गुप्तेश्वर पांडे आता राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली होती. पांडे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीही स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

गुप्तेश्वर पांडे यांनी शनिवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेविषयीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावर पांडे यांनी भूमिका मांडतांना “मी या ठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटायला आणि डीजीपी म्हणून माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिल्यानं त्यांचे आभार व्यक्त करण्यास आलो आहे, निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले होते.