बिलवाडी येथे शाळेतील आनंद मेळावा उत्साहात

0

बिलवाडी : जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील नुकतीच नुतन वर्षाच्या स्वागतानिमित्त आनंद मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुकदेव पाटील हे होते. आनंद मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिर्‍हाडे, केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे उपस्थित होते.

आनंद मेळाव्याला पंचायत समिती सदस्य प्रभाकर सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील, सदस्य रामकृष्ण मराठे, किरण पाटील, गोकूळ पाटील, रविंद्र गोपाळ, सुरेश वाघ, नामदेव सोनवणे, अवतार सोनवणे उपस्थित होते. फित कापून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यामेळाव्यात एकूण 60 स्ट्रॉ लावण्यात आले होते. या स्टॉलवर विविध खाद्यपदार्थांची विद्यार्थ्यांनी विक्री केली.

विद्यार्थ्यांनी लुटला आनंद
विद्यार्थ्यांना या आनंद मेळाव्यामुळे विविध खरेदी विक्रीच्या व्यवहारांचा अनुभव आला. गावातील पालक, विद्यार्थी, महिलांनी यावेळी प्रचंड उपस्थिती दिली. यावेळी उपशिक्षक संदीप पाटील यांनी सुत्रसंचलन केले. आनंद मेळाव्यासाठी महेंद्र पाटील, विनोद नाईक यांनी परिश्रम घेतले. गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची सृजनशीलता वाढण्यास मदत होणार आहे. अशा नवनवीन उपक्रमांमुळे इंग्रजी माध्यमातून मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.