बिग ब्रेकिंग ! रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणारा तरुण गजाआड

 

नंदुरबार रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने शहादा येथे अटक केली आहे. त्याच्याकडून इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या रेमडीसीवर इंजेक्शनचा मोठा घोळ सुरू असल्याची बाब उघड झाली आहे. पाचशे ते सातशे रुपये किमतीला मिळणारे हे इंजेक्शन काळ्याबाजारात दहा ते पंधरा हजार पर्यंत विकीला जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत,
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना याबाबत माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांनी सापळा काळ्याबाजारात इंजेक्शनची जादा दराने विक्री करणाऱ्या रतिलाल देवराम पवार राहणार सावखेडा या तरुणाला अटक केली आहे. एकामोटर सायकलवरून तो शहादा येथील शतायु हॉस्पिटलच्या दिशेने विक्री करणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

यावेळी त्याच्याजवळ एक इंजेक्शन आढळून आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार दीपक बाळकृष्ण गोरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, राजेंद्र घाटके, किरण मोरे, यशोदीप उगले या पथकाने केली