बिग बॉसमधून बाहेर पडताच सृष्टीने केला ‘हा’ खुलासा

0

मुंबई : कॉन्ट्रोव्हर्शिअल शो बिग बॉस १२ मधून सृष्टी रोडे घरातून बाहेर पडली आहे. सृष्टीने बाहेर येताच बिग बॉसला घेऊन अनेक खुलासे केले. बिग बॉसमध्ये तिने करणवीरला टॉप १ आणि सुरभी राणाला टॉप २ पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

सृष्टीने रोहितसोबतच्या नात्याचाही खुलासा केला आहे. ती म्हणाली, आमची मैत्री पवित्र आहे. आमच्यात असे काहीही नाहीये. रोहितहून जास्त बॉन्डिंग माझी करणवीरसोबत होती. मात्र, त्याला मुले आहे त्याचे लग्न झाले आहे म्हणून त्याच्यासोबत राहण्याचा संशय लोक माझ्यावर घेत नाही. तर रोहित यंग आहे म्हणून लोकांनी आम्हाला असे समजले, असे तिने स्पष्टीकरण दिला.