बिगर गॅस शिधापत्रिका धारकांनी कागदपत्राची मागणी

0

चाळीसगाव-  महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रकानुसार अनुदानित केरीसीन मिळण्यासाठी पात्र बिगर गॅस शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना आपले आधारकार्ड व भ्रमणध्वनी क्रमांक तात्काळ आपल्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेकडे सादर करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. शासन परिपत्रानुसार वारंवार सूचित करूनसुध्दा अद्यापही चाळीसगाव तालुक्यातील ज्या शिधापत्रिका धारकांनी आपले आधारकार्ड व भ्रमणध्वनी क्रमांक तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेकडे सादर केलेले नाहीत. अश्या सर्व बिगर गॅस शिधापत्रिकाधारकांनी आपले आधारकार्ड क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक त्वरीत पुरवठा शाखेकडे सादर करावेत.अन्यथा आपला अनुदानीत दराचा केरोसीन कोटा बंद करण्यात येईल याची सर्व केरोसीन मिळण्यास पात्र बिगर गॅस शिधापत्रिकाधारकांनी नोंद घ्यावी. असे तहसिलदार श्री.कैलास देवरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.