बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्यात 31 जोडप्यांचे विवाह संपन्न

0

तळेगाव दाभाडे : तळेगाव रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्यात 31 जोडप्याचे विवाह संपन्न झाले. या सोहळ्यातील वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळेगाव रोटरी क्लब गेली 20 वर्षे बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न करीत असून यावर्षीच्या सोहळ्यात 31 जोडपी सहभागी झाली होती. मावळ तालुक्याचे आमदार संजय (बाळा) भेगडे, रोटरी क्लबचे प्रातापाल अभय गाडगीळ, रोटरी अध्यक्ष मंगेश गारोळे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील विविध भागातील वधू-वर सहभागी
सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, मुळशी तालुक्यांबरोबर बीड, ठाणे, मुंबई तसेच सोलापूर जिल्ह्याबरोबरच राज्यातील विविध भागातील वधू-वर सहभागी झालेले होते. सहभागी जोडप्याच्या वधू-वरांचा पोशाख, बँड मिरवणूक, संसार उपयोगी भांडी, प्रत्येकी एक गॅस शेगडी कनेक्शन तसेच मोफत भोजन व्यवस्था तळेगाव रोटरी क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमास मावळ पंचायत समिती सभापती गुलाब म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र दाभाडे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, बाळासाहेब ढोरे, गणेश आप्पा ढोरे, गणेश भेगडे, प्रकाश ओसवाल, वैशाली दाभाडे, हेमलता खळदे, कल्पना गटे, शोभा भेगडे, मुकुंदराव भेगडे, शांताराम लष्करी, दत्ता पडवळ, संदीप पानसरे आदी उपस्थित होते.

आदींनी घेतले परिश्रम
लग्न सोहळा यशस्वी करण्यासाठी मंगेश गारोळे, महेश महाजन, बाळासाहेब चव्हाण, यादवेंद्र खळदे, विलास जाधव, विश्वनाथ मराठे, अशोक काळोखे, विजय काळोखे, संजय शहा, कैलास देसले, दीपक शहा, भालचंद्र लेले, अशोक पवार, श्रीराम ढोरे, उद्धव चितळे, सुधाकर शेळके, राजेंद्र पोळ, भावना चव्हाण, संगीता जाधव यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. राजेंद्र पोळ व अनिल धर्माधिकारी यांनी केले.