‘बाहुबली 2’चा प्रीमियर शो रद्द

0

मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षीत ‘बाहुबली2’ हा सिनेमा आज – शुक्रवारी रिलीज होणार होता तो रद्द करण्यात आला आहे.

विनोद खन्ना यांना श्रद्धांजली म्हणून आज होणार बाहुबली-2 चा प्रिमियर शो रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बाहुबलीच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला. विनोद खन्ना यांच्या निधनामुळे सिनेसृष्टी दु:खात आहे, आम्हीही या दु:खात सहभागी असून, आजचा बाहुबलीचा प्रीमियर शो रद्द करत आहोत. असे बाहुबलीच्या निर्मात्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.