बाळासाहेबांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

0

मुंबई – मुंबईच्या महापौर बंगल्याच्या आवारात दरवर्षी एक रूपया भाड्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाला जागा देण्याची तरतूद असलेले मुंबई महापालिका सुधारणा विधेयक गुरूवारी विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले.

नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी याबाबतचे विधेयक मांडले. त्यात भाडे निश्चित करण्यात आले नव्हते. हा भाडेपट्टा वर्षाला एक रूपया, असा नाममात्र असावा, अशी सुधारणा काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी सुचवली व ती मान्य करण्यात आली. त्यानंतर या सुधारणेसह हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. विधानसभेने हे विधेयक सुधारमेशिवाय मंजूर केले आहे.