Private Advt

बालिकेवर अत्याचार : धुळ्यातील घटना, संशयीत ताब्यात

धुळे : देवपुरातील नगावबारी परीरसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी 13 वर्षीय मुलीच्या तक्रारीनुसार त्याच परीसरातील एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीताला अटक करण्यात आली.

लग्नाच्या आमिषाने पीडीतेवर अत्याचार
देवूपूरातील नगावबारी परीरसरातील रहिवासी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच परीसरातील रहिवासी अजय कोंडाजी गुंजाळ याने तू मला आवडते, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून बालिकेसोबत जवळीक साधली व तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत अजय गुंजाळ याला अटक केली असून न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली. तपास पोेलिस अधिकारी सचिन बेंद्रे करीत आहे.