बालाजी पेठेत घरात घुसून तरुणीच्या चेहऱ्यावर चॉपर मारले

0

जळगाव : कौटुंबिक तसेच जुन्या वादातून काही तरुणांनी बालाजी पेठेत एका घरात घुसून घरातील तरुणीच्या चेहऱ्यावर चॉपरने हल्ला केला तसेच तिच्या वडिलांवरही वार करून हल्ला गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. सतीष शर्मा व त्यांची मुलगी राधीका शर्मा अशी जखमींचे नावे आहेत. दोघांना उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले आहे

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की ज्या घरात हल्ला झाला त्या कुटुंबीयांचा काहीतरी जुना वाद आहे. या वादातून तीन ते चार तरुण शनिवारी रात्री बालाजी पेठेत आले येताच त्यांनी शर्मा कुटुंबियांशी वाद घालत वादातुन घरातील २४ वर्षीय तरुणीच्या चेहऱ्यावर चॉपरने हल्ला केला. यानंतर तिच्या वडिलांवरही वार करत त्यांनाही गंभीर जखमी केले घटनेची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले होते उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.

Copy