बालनाट्य स्पर्धेत चिमुकल्यांनी जिंकली मने

0

जळगाव । महाराष्ट्र शासनाकडून पारितोषिक मिळालेल्या नाट्य महोत्सवाचे आयोजन राज बहुद्देशीय संस्था शिवाजीनगर जळगावच्या वतीने शहरातील गंधे सभागृहात करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध शाळा, विद्यालयाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी बालनाट्य सादरीकरण केले. यावेळी जिल्ह्यातील नाट्यकर्मी सह प्रेक्षकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. प्रमुख मान्यवर म्हणून आमदार.राजूमामा भोळे, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पुरवठा विभागाचे बाळासाहेब नन्नवरे, फिरोज पठाण यांची उपस्थिती होती.

विद्यार्थांचा सम्मान
नाट्य महोत्सवात सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थांचा सम्मान करण्यात आला.अश्विनी सोनवणे,तन्वी काटकर,ऋषिकेश पिगळे, तुषार पाटील,मयूर मरसाळे,विजय उमप,गौरव सोनावणे,अजय पाटील कलावंतांचा सम्मान राज जळगाव यांच्या वतीने करण्यात आला.

महाविद्यालयांचे सादरीकरण
जळगाव जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांनी या मध्ये विशेष सहभाग घेतला होता. या मध्ये अनुभूती इंग्लिश स्कुल (छत्री),खुबचंद सागरमल विदयालय. जळगाव (वासुदेव आला रे),यादव देवचंद वाणी (मुले देवा घरची फुले), महाराष्ट्र राज्यात बाल नाट्य स्पर्धेत प्रथम आलेले (मिनू कुठे गेला) शारदा माध्यमिक विद्यालय. दिपनगर. जळगाव यांनी या वेळी नाटकांचे सादरीकरण केले. कार्यक्रमासाठी राज संस्थेचे अध्यक्ष हनुमान सुरवसे तसेच सहकारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले.