‘बार्सिलोना’च्या धर्तीवर शहरात अमंलबजावणी कठीण – आयुक्त

0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात स्पेनमधील बार्सिलोनाच्या धर्तीवर नवनवीन विकास प्रकल्पांची अमंलबजावणी करणे कठीण असले, तरीही अशक्य नाही, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिली. या दौर्‍याची माहिती देण्यासंदर्भात शुक्रवारी महापौर कक्षात सर्वपक्षीय पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महापौर राहूल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे नगरसेवक सचिन चिखले, माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता राजन पाटील आदी उपस्थित होते.
146 देश, 700 हून अधिक शहरांचा… 
आयुक्त म्हणाले की, स्पेन येथील बार्सिलोना शहरात 13 ते 15 नोव्हेंबरला पार पडलेल्या ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018’ या परिषदेत स्मार्ट सिटीचे संचालक मंडळ सहभागी झाले होते. यात जगातील 146 देशांनी तसेच 700 हून अधिक शहरांनी सहभाग नोंदविला होता. 844 स्टॉलचे प्रदर्शन यावेळी पाहावयास मिळाले. तर 400 हून अधिक जागतिक दर्जाच्या वक्त्यांचे यावेळी मार्गदर्शन लाभले. वेगवगेळ्या संकल्पना राबवून आपले शहर अधिकाधिक स्मार्ट कसे करता येईल, या दौर्‍यात नागरी विकास, तंत्रज्ञान, सार्वजनिक परिवहन, सक्षमीकरण, पादचारी, क्रिडागंणे, पादचारी, सायकल ट्रॅक, हॉकर्स झोन आदी स्टॉलची पाहणी करुन माहिती घेतली. लोकसहभागातून शहर विकास केलेली अनेक स्मार्ट सिटी त्या सहभागी झालेले होते. ई-बाईक, ‘इलेक्ट्रिक’ बस, क्रीडा क्षेत्राला दिलेले मोठे स्थान, त्याच धर्तीवर शहरात क्रीडा क्षेत्राचा विकास प्राधान्याने पाहावयास मिळाला.
वाहतुक व्यवस्थेसाठी दौरा महत्वाचा
तेथील सोयी-सुविधांनूसार पिंपरी चिंचवड विकास आराखड्यात त्यांचा समावेश करुन सुधारित योजना राबविण्यात येतील. शहरात प्रशस्त फुटपाथ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरण, सायकल ट्रॅक, प्रशस्त रस्त्यांचा समावेश असणार आहे, तसेच बार्सिलोना दौर्‍याचा खर्चाची प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण केली आहे. त्याचे सर्व ‘रेकॉर्ड’ ठेवले जाईल. त्यामध्ये कुठेही अनियमितता झाली नाही, असेही यावेळी सांगितले. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे सचिन चिखले आदींनी या दौर्‍याची सविस्तर माहिती दिली.
Copy