बारा प्रकल्पांसाठी वर्षभराच्या खर्चाची तरतूद

0

सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजल प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निविदा

पुणे : महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील विविध बारा ठिकाणी चालविण्यात येणार्‍या सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजल प्रकल्पांच्या वर्षभराच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदेला गुरुवारी स्थायी समितीने मान्यता दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

फुलेनगर, नगर रस्ता, कोथरूड, संगमवाडी, औंध, घोले रस्ता, ढोले पाटील रस्ता, कोरेगाव पार्क, पेशवे पार्क, वर्तक उद्यान, गरवारे महाविद्यालय, भक्तिसागर स्मशानभूमी वडगाव शेरी या 12 ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावणारे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची देखभालीचा करार संपला होता. करार वाढवून प्रकल्प पुढे चालवण्याची मागणी केली जात होती, त्यामुळे या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे मुळीक यांनी सांगितले. त्यानुसार श्री गणेश एंटरप्रायझेसच्या सुमारे 73 लाख 16 हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली.

कचराडेपोवर वर्षानुवर्षे पडून

शहरात दररोज अठराशे ते दोन हजार टन घनकचरा गोळा केला जातो. त्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचर्‍याचे प्रमाण टन टक्के इतके आहे. यामध्ये सॅनिटरी कचर्‍यात सॅनिटरी पॅडसआणि डायपर्सचा समावेश असतो. या कचर्‍याचे लवकर विघटन होत नसल्याने कचराडेपोवर वर्षानुवर्षे पडून राहतो. या कचर्‍याची हाताळणी करताना आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने विविध भागात प्रकल्प उभारले आहेत. स्थायी समितीच्या निर्णयाने या प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती शक्य होणार आहे.

Copy