बारामतीचे बिल्डर दादा सांळुखे यांची हत्या

0

बारामती : बारामती मधील प्रसिद्ध बिल्डर दादा साळुंखे यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. यामुळे बारामतीमधील व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उजनी धरण पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता मृतदेहाच्या ठिकाणी चारचाकीच्या वाहनाच्या चाकांच्या खुणा आढळून आल्या. यावरून इतरत्र कोठेतरी खून करून मृतदेह पुलाखाली आणून टाकला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात हा मृतदेह बारामतीमधील बांधकाम व्यावसायिक दादा साळुंखे यांचा असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून सांळुखे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉटर्मसाठी पाठवला आहे.या हत्ये प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून प्रत्यक्षदर्शी, कुंटुंबिय आणि सांळुखे यांच्या कॉल रेकॉर्ड तपासले जात आहेत.

Copy